शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

Thursday 23 October 2014

आकाश कंदील कसा बनवावा

दिवाळी हा सर्वार्थाने घरातल्या प्रत्येकाचा सण. दिवाळी आली की वेगवेगळ्या आघाड्यांवर सगळं घर तयारीला लागतं. एकीकडे घराची साफसफाई, रंगरंगोटी चालु असते. तर दुसरीकडे फराळाचे मस्त पदार्थ चालू असतात. लहानांना सुट्ट्या असतात. पुर्वी किल्लेही बनवले जात. एकत्र कुटंबांमधे तर आपेष्ट जमलेले असतात. मनसोक्त हास्य विनोदात आठवडा कसा जातो ते कळतही नाहि.
आज दिवाळीचा पहिला दिवस. वसुबारस!
आमच्या घरी आज दिव्यांची रोषणाई आणि कंदिल लागतो. त्यामुळे गेला विकांत कंदिल बनविण्यासाठी राखून ठेवला होता. अजूनहि मी कंदिल घरीच बनवतो. दर तीन वर्षांनी तर कंदिलाचा सांगाडाहि नवा बनतो. कंदिल बनवणे हि कला असली तरी त्यात कठीण काहि नाहि. हस्तकलेचा एक नमुना. बालगोपाळांसाठी तर आनंदाची पर्वणी.
तर असा पारंपारिक कंदिल कसा बनवायचा हे आज बघुया का?
चला तर करूया सुरवात!
१. एक लांब बांबु मिळवा. आणि कोयत्याने त्याच्या छोट्या काठ्या/काड्या कापा. सुरीने त्या तासून एकदम गुळगुळीत बनवा. एकाच जाडीच्या एकाच मापाच्या ३२ काड्या/काठ्या तयार झाल्या पाहिजेत. या शिवाय चार दुप्पट लांबीच्या काठ्या तासा.
२. आता फुलपुडीच्या दोर्‍याने (हा दोरा काड्या अतिशय घट्ट बांधतो. शिवणकामाचे दोरे उपयोगाचे नाहित) त्यातील चार चार काड्या चौरसाकृती पद्धतीने एकत्र बांधा.
अश्याप्रकारे ८ सारखे चौरस तयार झाले पाहिजेत.
३. आता त्यातल्या चार चौरसांना एका अक्षातून जातील अश्या पद्धतीने लांब काठ्या बांधा. या काठ्या चौरसाच्या टोकांना समान लांबीने बाहेर आल्या पाहिजेत. आता या चार चौरसांना पतंगासारखे कोनात पकडून एकमेकांना कोपर्‍यावर बांधा. चार चौरस बांधल्यावर एक खोक्यासारखा आकार तयार होईल व लांब काठ्या वर व खाली बाहेर येतील.
४. आता या चौरस-पतंगाकृती भिंतीच्या खोक्याच्यावर व खाली उरलेले चार चौरस, दोन वर व दोन खाली या पद्धतीने बांधून टाका . झाला सांगाडा तयार. Smile
यंदा सांगाडा न बनवता फक्त कागद लावणे इतकेच काम होते त्यमुळे वरील टप्प्यांचे छायाचित्र काढता आले नाहि. परंतू तयार झाल्यावर सांगाडा असा दिसतो:

५. आता सांगाडा बनला की अर्धे काम झालेच!. आता फक्त कागद लावून कंदिल सजवणे राहिले. त्यासाठी तुम्हाला आवडतील त्या रंगांचे अथवा एकाच रंगाचे पतंगाचे कागद आणा.

६. पतंगाच्या कागदांचे चार चौरस कापा. हे चौरस मुळ चौरसापेक्षा किंचीत मोठ्या आकाराचे हवेत म्हणजे ते नीट चिकटवता येतात. आता खालील चित्रात दाखवल्या प्रमाणे चार उभ्या चौरस-पतंगाकृती खोक्याच्या भिंतींना हे कागद चिकटवा.

७. आता ८ त्रिकोण कापा. लक्षात ठेवा हे त्रिकोण चौरसाचे अक्षात कापून बनवू नका कारण ते तिरके असल्याने समभुज त्रिकोण नसून समद्वीभुज त्रिकोण असतात. तसेच काड्यांच्या जाडीने आकार अधिक लांबुडका होतो. हे आठ त्रिकोण खाली दाखवलेल्या पद्धतीने लावा.

८. आता करंजा करुयात. म्हणजे खायच्या नाहित हो तर कंदिलाच्या :)पतंगाच्या कागदाच्या काहिर्‍या रंद पट्ट्या कापा व त्या इतक्या रंद असल्या पाहिकेत की त्या रुंदीच्या चौरसाचा कर्ण कंदिलाच्या वरील पट्टीच्या मापापेक्षा किंचीत अधिक असला पाहिजे. पुढे दाखवलेल्या चित्राप्रमाणे कडा नक्षीदार कापून दोन टोके चिकटवून करंजा बनवा. भरपूर करंजा बनल्या की कंदिलाच्या वर व खालील पट्ट्यांमधे चिकटवा.

९. आता झिरमिळ्या बनवण्यासाठी पतंच्या कागदांच्या बारीक रुंदीच्या पट्ट्या कापा. जर रंगेबीरंगी झिरमिळ्या हव्या असतील अथवा वेळ कमी असेल तर मी यंदा वापरल्या तश्या वाढदिवसाच्या क्रेप पट्ट्याहि चालून जातात.
१०. आता कंदिलाच्या कडा चिकटवा-चिकटवीने काहिश्या विचित्र दिसतात त्या झाकण्यासाठी काळ्या अथ्वापांधर्‍या अथवा सोनेरी पट्ट्यांनी कडा झाकून टाका. कंदिलाच्या टोकांवर कागदाची फुले अथवा मी लावल्या आहेत तसे कागदी बोंडे लावा. झाला तुमचा कंदिल तय्यार. घराबाहेर दिमाखात लावा.. घरचा कंदिल!!

कंदिल करा आणि त्याचा शिक्षक कट्टा वर फोटो डकवायला विसरू नका.
Winkटिपः
१. कंदिल बनवताना परदेशस्थांना बांबु स्टिक मिळतील का माहित नाहि. त्याऐवजी लांब(साधारण फुटभर) पेन्सिलिंनी प्रयोग करता येईलसे वाटते (स्वतः हा प्रयोग केलेला नाहि)
२. कंदिलात वापरलेली रंगरंगती हा नातवाईकांतील लहानग्यांचा चॉईस आहे. प्रत्येक लहानग्याच्या आवडीचा रंग कंदिलात वापरायचे बंधन होते


साभार- मिसळपाव वरून 
नक्की भेट द्या .http://www.misalpav.com    या पत्त्यावर

1 comment: