निवेदन
मंगळवार, दिनांक २५ नोव्हेंबर, २०१४ रोजी (शाळांच्या सोयीच्या दृष्टीने हा कार्यक्रम ११ नोव्हेंबरऐवजी २५ नोव्हेंबर निश्चित केली आहे.) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमिताने ‘सरकारी आणि अनुदानित शाळांपुढील आव्हाने’ या विषयावर एक परिषद आयोजित करत आहे.
स्थळ : ‘रंगस्वर’, चौथा मजला, मंत्रालयासमोर, मुंबई

वेळ : सकाळी ०९:३० ते सायंकाळी ५:०० वाजेपर्यंत
परिषदेच्या उद्घाटनासाठी महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री मा. ना. विनोदजी तावडे आणि शालेय शिक्षण विभागाच्या सचिव श्रीमती अश्विनी भिडे यांना निमंत्रण दिले आहे. याच दिवशी डॉ. कुमुद बन्सल उत्कृष्ट शैक्षणिक ग्रंथ पुरस्कार, ‘ई-लर्निंग’मध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या एका शिक्षकाला पुरस्कार आणि उत्कृष्ट शैक्षणिक ब्लॉग/वेबसाईटला पुरस्कार हे ती पुरस्कारसुद्धा प्रदान करण्यात येतील.
उद्घाटनानंतर या विषयांच्या विविध पैलूंवर श्री. दिनकर पाटील (शिक्षण सहसंचालक), श्री. रामनाथ मोते (शिक्षक आमदार), श्री. प्रदीप कंद (सभापती, शिक्षण समिती, पुणे जिल्हा परिषद), श्री. अरुण थोरात (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ), श्री. रमाकांत पांडे (शैक्षणिक व्यवस्थापक महामंडळ), श्री. जहीर काझी आणि डॉ. श्रुती पानसे (शिक्षणक्षेत्राच्या अभ्यासक) हे मान्यवर आपले विचार मांडतील. भोजनोत्तर सत्रात उपस्थित प्रतिनिधी खुल्या चर्चेत आपले विचार मांडू शकतील.
या परिषदेसाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही. या परिषदेत सहभागी होऊन आपण आपल्या बहुमोल सूचना मांडाव्या ही विनंती. आपल्या मित्रांनाही या परिषदेबाबत माहिती द्यावी. परिषदेबाबत आणखी माहिती हवी असल्यास vasant.kalpande@gmail.com वर लिहावे. या विषयावर एखादा लेख किंवा टिपण कोणाला द्यायचे असल्यास मला मेल करावे; म्हणजे त्यांच्या प्रती परिषदेत देता येतील.
डॉ. वसंत काळपांडे
मुख्य संयोजक,
शिक्षण विकास मंच,
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

No comments:
Post a Comment