अधिकारी असावेत तर असे... तृप्ती मॅडम आम्हास आपला सार्थ अभिमान आहे...
!!!नतमस्तक !!!
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
हायटेक शाळा, आनंददायी शिक्षण -
गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे
!!!नतमस्तक !!!
★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
हायटेक शाळा, आनंददायी शिक्षण -
गटशिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
श्री. विनोद काकडे, औरंगाबाद यांचा आजच्या लोकमत मधील लेख....
माजलगाव. जि. बीड. ‘त्या’
येण्यापूर्वी शिक्षणाचा दर्जा खालावलेला होता,
शालेय गळतीचं प्रमाण जास्त. पण दीड वर्षात
त्यांनी दाखवून दिलं की, ग्रामीण
भागातही ‘हायटेक’ शिक्षण देता येऊ शकतं.
दुष्काळी, मागासलेला अन् ऊसतोड
कामगारांचा जिल्हा, अशी बीडची ओळख.. त्यात
जिल्हा परिषद शाळांबाबत प्रचंड अनास्था अन्
दुरवस्थाही. या मागास म्हणून
हिणवल्या जाणार्या जिल्ह्यातल्या माजलगाव
तालुक्याचा शैक्षणिक दर्जा अत्यंत खालावलेला. मात्र
हे चित्र बदलू शकतं हे त्यांनी अवघ्या दीड वर्षात
दाखवून दिलं. तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा तर
उंचावलाच, शिवाय शिक्षणाला ‘हायटेक’
चेहराही दिला.
तृप्ती अंधारे त्यांचं नाव. त्या माजलगाव तालुक्यात
गटशिक्षणाधिकारी आहेत.
मूळच्या उस्मानाबादच्या. सधन कुटुंबातल्या. आई-
वडील दोघंही नोकरी करणारे. बारावीनंतर
अँडमिशनचा विषय पुढे आला तेव्हा डीएडला जाण्याचं
निश्चित झालं. शिक्षक म्हणून
पहिली नोकरी लागली ती उस्मानाबाद
जिल्ह्यातील अंबेवाडी गावात. दुसरीकडे
स्पर्धा परीक्षांची तयारीही त्या करत होत्याच.
यश मिळालं
आणि त्यांची गटशिक्षणाधिकारीपदी निवड झाली.
ऑगस्ट २0११ मध्ये त्यांना पहिली पोस्टिंग
मिळाली ती बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात.
शिक्षणाचा दर्जा वाढविण्याबरोबरच मुलांमध्ये
शिक्षणाची रुची निर्माण
करण्यासाठी त्यांनी प्रयत्न आणि नवनवे प्रयोग केले.
अंधारे यांनी पदभार
स्वीकारला तेव्हा मध्यांतराच्या सुट्टीनंतर
विद्यार्थी शाळेतून गायब होण्याचे प्रमाण प्रचंड
होते. ही गळती रोखण्यासाठी त्यांनी ‘५0 गाणी अन्
२00 गोष्टी’ हा अनोखा उपक्रम तालुक्याच्या जि.प.
शाळांमध्ये राबविला. शाळा सुटण्याच्या अर्धा तास
अगोदर विद्यार्थ्यांना दररोज त्यांच्या आवडीचं एक
गाणं आणि एक सुंदर गोष्ट सांगण्यात येते.
या उपक्रमामुळे मध्यंतरानंतर मुलांची गळती थांबली.
गोष्ट आणि गाणं ऐकण्यासाठी मुलं शाळेतच थांबू
लागली. या उपक्रमाबरोबरच मुलं लहानपणापासून
स्पर्धा परीक्षेसाठी तयार व्हावे, या उद्देशानं
तृप्ती अंधारे यांनी ‘एक दिवस-एक प्रश्न’
असा उपक्रम सुरू केला. दररोज
सकाळी प्रार्थनेच्यावेळी तालुक्यातील सर्व जि. प.
शाळेच्या विद्यार्थ्यांना शिक्षक
सामान्यज्ञानाचा एक प्रश्न सांगतात
आणि उत्तरही सांगतात. शिवाय हे प्रश्न व उत्तर
मुलांकडून म्हणून घेतात आणि वहीवर त्याची नोंद करून
घ्यायला सांगतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे
लोकसहभागातून अनेक शाळांचं रुपडं बदलून गेलं आहे.
तृप्ती अंधारेंना विचारा, हे सगळं कसं जमवलं,
त्या सांगतात, ‘ही सर्व कामं करत असताना अनेक
लोकांनी उत्स्फूर्त सहभाग, सहयोग दिला; तर
काहींनी त्यांची गैरकामं करून दिली नाहीत म्हणून
जाणीवपूर्वक त्रास देण्याचा, कामात अडथळे
आणण्याचा प्रयत्नही केला. स्त्री म्हटलं की,
चारित्र्यावर हल्ला करणं हे इथलं ठरलेलं शस्त्र. हे
शस्त्र माझ्यावरही उगारण्यात आलं. मनोधैर्य
खच्ची करण्याचे प्रयत्नही झाले. सुरुवातीला या सर्व
गोष्टी मी मनावर घ्यायचे आणि खचूनही जायचे. पण
नंतर लक्षात आलं की, चांगलं शिक्षण मिळावं
ही इथली गरज आहे. त्रास
देणार्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकी अन् मदत
करणारे, सोबत चालणारे जास्त आहेत. असा विचार
केला की, मनातील मरगळ दूर होते आणि हात
पुन्हा जोमानं कामाला लागतात. आठवतात
बाबा आमटेंच्या ओळी, ज्या म्हणतात.
‘अजून दूर क्षितिज आमुचे
अजून जायचे पुढे
पुन्हा नमवू वादळ वारे
पुन्हा उभारू शिडे..’
एका क्लिकवर माहिती.
आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा अन्
त्या अंतर्गत येणार्या शाळा, शिक्षक
आणि कर्मचार्यांचं कामकाजच हायटेक करून टाकलं.
जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात हे असं एकमेव
गटशिक्षणाधिकारी कार्यालय असेल ज्याचं कामकाज
ई- प्रशासन (इंटरनेट) व एम- प्रशासन (मोबाइल)
या प्रणालीवर चाललं. कामकाजासंदर्भातला सर्व
पत्रव्यवहार, रेकॉर्ड नोंदणी हे काम ई- मेल
आणि मोबाइल मेसेजवर चालतं. विशेष म्हणजे
गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचा लूक व
कामकाजही त्यांनी ‘कॉर्पोरेट’ कार्यालयासारखं केलं
आहे. येथील सर्व शिक्षक- कर्मचारी गणवेशात
आणि ‘आयकार्ड’सह दिसून येतात. विशेष म्हणजे
कार्यालयाचं अंतर्बाह्य रूप बदलण्याचं काम अंधारे
यांनी लोकसहभागातून केलं आहे.
माजलगाव
गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचीही वेबसाइट आहे.
या वेबसाइटमुळे एका क्लिकवर तालुक्यातील शाळा,
विद्यार्थी, शिक्षक यांची संख्या,
उपक्रमांची माहिती अपडेट उपलब्ध आहेत. शिवाय
संपूर्ण कार्यालय
सीसीटीव्ही कॅमेर्याच्या निगराणीखाली आहे...(लोकमत सखी 10 आॅक्टोबर 2013 मधुन साभार... )
ideal gatshikshanadhikari
ReplyDelete