शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांना हवे असणारे सर्व काही देणारे मराठी शैक्षणिक संकेतस्थळ. ऑनलाइन टेस्ट, ई-लर्निंग, ई-बुक्स, कला ,क्रीडा व आणखी बरेच काही .

Thursday, 18 December 2014

“शाळाभेट ”सर्जनशील शिक्षकांच्या उपक्रमशील शाळा ......!!!


पुस्तकाचे नाव : ”शाळाभेट ”          लेखक: नामदेव माळी (गटशिक्षणाधिकारी,मिरज).    मुखपृष्ठ :   गिरीश सहस्रबुद्धे .      प्रकाशक :नरेंद्र दाभोलकर. “साधना प्रकाशन ” ४३१,शनिवार पेठ,पुणे ४११०३०      किंमत:१००/- रु.                     पुस्तक विक्रीसाठी उपलब्ध  आहे.         संपर्क : 9423869404 (नामदेव माळी )    किंवा      संपर्क साधा  :  ०२०-२४४५९६३५  ( साधना प्रकाशन, पुणे )
  जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षणाचा खेळखंडोबा झालाय असं म्हटलं जातं पण ते तितकंसं खरं नाही ! तुमच्या-माझ्या आसपास कितीतरी चांगल्या शाळा व चांगले शिक्षक आहेत.ते मन लावून,जीव ओतून काम करत आहेत.तेथे शाळा आहे व शिक्षणही आहे ! ही बाजू समोर आली पाहिजे ज्यायोगे काम करणा-यांचा उत्साह वाढेल व त्यांना प्रेरणा मिळेल या भावनेतून उपक्रमशील व सर्जनशील गटशिक्षणाधिकारी नामदेव माळी यांनी विविध उपक्रमशील शाळांना भेटी देऊन तेथील विविध नवोपक्रमांना शब्दबद्ध करून एक सुंदर शाळांची मालिका “शाळाभेट” या पुस्तकातून गुंफली आहे.
शाळा आहे आणि शिक्षणही आहे हे सत्यात उतरविणा-यासाठी जीव ओतणा-या शिक्षकांना हे पुस्तक श्री.नामदेव माळी यांनी समर्पित केलेले आहे,यातूनच त्यांची शिक्षणक्षेत्रावरील निष्ठा दिसून येते.थर्टी फाईव्ह उपक्रमांची शाळा शहापूर, उपळीत होतेय सहज शिक्षण, आस्थेच्या शाळेतील सावित्रीच्या लेकी, शेतीचे धडे देणारी शेळकेवाडीची शाळा ,स्पर्धा परीक्षेचे बाळकडू नाधवडे गावात,स्वप्न वाटावी अशी शाळा, निरक्षर शिक्षकाची शाळा :विठ्ठलाईनगर अशा ‘एक से बढकर एक ’ शाळांची सर्वांगीण माहिती त्यांनी संकलित केलेली आहे.
साधी,सोपी ओघवती भाषा तसेच अगदी छोट्या छोट्या बाबी अचूक हेरून त्यांची सुंदर गुंफण हे या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य. प्रत्येक शिक्षक,पालक आणि शिक्षण क्षेत्राशी निगडीत असणा-या प्रत्येकाच्या संग्रही असावे असे हे एक अप्रतिम पुस्तक आहे.यातील अनेक उपक्रम आपल्या शाळेवरही राबवता येतील .आजच हे अप्रतिम पुस्तक खरेदी करा.

No comments:

Post a Comment