मनोगत
"सा-या कोवळ्या जीवांना,
उजेडाचा गंध यावा..याचे
उजेडाच दान देण्या
झोपडीत सूर्य यावा.!"
या चार ओळी मनात घेवून ४ फेब्रुवारी २००५ रोजी मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचाळा तालुका पैठण जिल्हा औरंगाबाद येथे रुजू झालो.शिक्षणसेवक म्हणून काम करत असताना अवघ्या दोन महिन्यातच मुख्याध्यापक पदाचा चार्ज घेण्याची जबाबदारी माझ्यावर आली.परंतु या जबाबदारीला मी ओझे न समजता संधी समजून काम करायला सुरुवात केली. एक शिक्षक आणि ५४ विद्यार्थी असताना विद्यार्थी ग्रामस्थ व पालक यांना बरोबर घेऊन शाळा सुधारणेसाठी सुरुवात.शाळेबद्दल आजीबात आत्मीयता नसणा-या पालकांचे मन वळवण्यात मी यशस्वी ठरलो ,आणि याच पालकांनी दीड लाखाहूनही अधिक ग्रामसहभाग मला शाळा सुधारण्यासाठी दिला.सर्वप्रथम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे मी लक्ष दिले.आणि अल्पावधीतच विद्यार्थ्यात त्याचे प्रतिबिंब दिसू लागले.शाळेचे वातावरण बदलण्यासाठी मी स्वतः ब्रश हाती घेतला आणि शाळा सुटल्यानंतर शाळेचे वर्ग व सर्व भिंती रंगवून बोलक्या केल्या.शाळा सुंदर दिसू लागली आणि शाळाबाह्य विद्यार्थी शाळेकडे आकर्षित झाले व शाळेत रमू लागले. याच वेळी दुसरे शिक्षक श्री.खंडागळे सर शाळेवर रुजू झाले,त्यानंतर वैभव खेडकर हे सहकारी आले.आम्ही सर्वांनी मिळून शाळा सर्वांगसुंदर करण्यासाठी धडपड सुरु केली .याला साथ होती अर्थातच ग्रामस्थांची आमच्या प्रत्येक गोष्टीत आम्ही ग्रामस्थांना सहभागी करून घेतले.त्यामुळेच ग्रामस्थांनी शाळेला एक खोली कार्यालयासाठी बांधून दिली.तीन संगणक,लाउडस्पीकर संच,फर्निचर दिले.शाळेची अनेक ,मुले नवोदय,शिष्यवृत्ती परीक्षेत चमकू लागली ,आणि आजूबाजूच्या गावांतून मुले आमच्या शाळेत शिक्षणासाठी येऊ लागली.४ थी पर्यंतची शाळा मी मुख्याध्यापक असताना ७ वी पर्यंत नेली.५४ विद्यार्थ्यावरून शाळेची पटसंख्या २२१ झाली आणि शाळेला शिक्षकांची ७ पदे मंजूर झाली.सन २००७-०८ साली आम्ही स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धेत सहभाग घेऊन पैठण तालुक्यात प्रथम क्रमानी मिळविला.त्यानंतर सन २००८-०९ मद्धे औरंगाबाद जिल्ह्यातून प्रथम क्रमांक मिळविला .सन २००८-०९ व २००९-१० मद्धे सलग दोन वर्षे औरंगाबाद जिल्ह्यातून सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविला.या शाळेची चर्चा संपूर्ण औरंगाबाद जिल्ह्यामद्धे झाली अनेक अधिकारी,पदाधिकारी, शिक्षक शाळेला भेटी देऊ लागले.ग्रामविकास मंत्री विजयसिंह मोहिते पाटील,महसूल राज्यमंत्री सुरेश आण्णा धस अशा अनेक पदाधिका-यांनी शाळेला भेटी देऊन शाळेचे कौतुक केले.एका शिक्षकाला आयुष्यभरात जेवढे हवे त्यापेक्षा कितीतरी पट अधिक प्रेम आणि समाधान या शाळेवर मला मिळाले.सन २०११ साली मी आंतरजिल्हा बदलीने जि.प.कें.प्रा.शाळा जामगाव तालुका आष्टी येथे रुजू झालो.ही शाळा तर सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातून व विभागातून प्रथम तर राज्यातून तृतीय आलेली.सर्व शिक्षक अतिशय होतकरू व तडफदार ,त्यांच्या बरोबर काम करायला मजा आली .अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या.या शाळेवर ई-लर्निंग सुरु करून राज्यातील पहिली जि.प.ई-लर्निंग शाळा आम्ही केली.हस्ताक्षर सुधार,बचत बँक;ज्ञानगौरव स्पर्धा,बाल आनंद मेळावा ,असे अनेक उपक्रम आम्ही राबविले.या शाळेवरून सन २०१४ जुलै मद्धे मी जि.प.कें.प्रा.शाळा पारगाव येथे रुजू झालो या ठिकाणीही १ महिन्याच्या आत आम्ही पालक सहभागातून ई-लर्निंग स्कूल सुरु केली.
शिक्षणाच्या या वाटेवर अविरत प्रवास करत असताना अनेक दीपस्तंभ मला भेटले.यामद्धे प्रामुख्याने बीड जि.प.चे शि.वि.अ.मनोजराव धस साहेब, मुंबई उत्तर चे शिक्षण निरीक्षक मा.अनिल साबळे साहेब, मुंबई दक्षिण चे शिक्षण निरीक्षक मा.भाऊसाहेब चव्हाण साहेब ,केंद्र प्रमुख नल्लेवड सर माझे शिक्षक मित्र संतोष मरे,राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक संदीप पवार सर (जरेवाडी)अशोक करडूले या मित्रांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केले आणि माझ्यातील ज्ञानदीप तेवत ठेवला.
महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री नामदार सुरेश आण्णा धस यांनी तर माझ्यासारख्या शिक्षकावर कुटुंबातील सदस्यासारखे प्रेम करून मला सतत चांगल्या शैक्षणिक कार्यासाठी प्रेरणा दिली.त्यांच्या मी ऋणातच राहू इच्छितो.
शिक्षक कट्टा या ब्लॉग च्या माध्यमातून मी धडपड्या शिक्षकांना आवश्यक असणारे ई-लर्निंग सॉफ्टवेअर ,तसेच अनेक बाबी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे.ही वेबसाईट आपल्याला निश्चितच मार्गदर्शन ठरेल या अपेक्षेसह...
सोमनाथ वाळके
(७५८८५३५७७७)
आपल्या शिक्षण प्रवाहात केलेल्या कार्याचा आमच्या समोर आदर्श आहे.............
ReplyDeleteआभारी आहे नाईक सर
DeleteGreat work sir
ReplyDeletevery nice and inspirational work by mr.walke sir.
ReplyDeleteखूप सुंदर सर,आपले कार्य प्रेरणादायी आहे
ReplyDelete.माझा blog zpprimaryschoolkayre.blogspot.in ला भेट देउन कमेंट करा प्लीज .
its an ideal work walake sir .
ReplyDelete